अरविंद केजरीवालांना सुप्रिम कोर्टाचा मोठा धक्का; एसीबी केंद्राच्या अधीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गुरुवारी दिलेल्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली सरकारविरुद्ध नायब राज्यपाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आता केंद्र सरकारच्या अधीन असणार आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

केंद्रीय केडर अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीवरून दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद होते. यामुळे हा मुद्द्याला वरिष्ठ खंडपीठाकडे पाठण्यात आला. या प्रकरणावर आज न्यायमूर्ती एके सीक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.

 

चौकशी आयोग नेमण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असणार आहेत. तसेच दिल्लीतील वकिलांची नियुक्ती करण्याचे अधिकार दिल्ली सरकारकडे असणार आहेत आणि शेत जमिनीचे दर ठरविण्याचे अधिकारही दिल्ली सरकारला सोपविण्यात आले आहेत, असा निर्णयही न्यायालयाने दिला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@