वरवरा राव पुन्हा येरवडा तुरुंगात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |


पुणे : शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात अटक झालेले प्रा. वरवरा राव व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग या दोघांची मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यात २०१६ मध्ये सूरजगड डोंगरावर नक्षलवाद्यांनी ८० वाहनांना आग लावली होती. यात नक्षली नेता नर्मदक्कासह कमांडर साईनाथचाही सहभाग होता. पोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्क व कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजगडच्या जाळपोळ प्रकरणात वरवरा राव आणि गडलिंगविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

 

गडचिरोली पोलिस त्यंना दोघांना कधीही ताब्यात घेऊ शकतात. प्रा. वरवरा राव आणि नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग यांना गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी अटक केली. तेव्हापासून दोघेही पुणे पोलिसांच्या ताब्यात होते.

 

३१ जानेवारीला गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुणे कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्यांना अहेरी येथील न्यायालयाने ११ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. दरम्यान, सोमवारी कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@