हा पुरस्कार माझा नाही तर मल्लखांब खेळाचा : उदय देशपांडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा अत्यंत मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारजाहीर झाल्यापासून देशपांडे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तथापि, स्वतः उदय देशपांडे यांनी मात्र, हा पुरस्कार प्रत्यक्षात मला मिळालेला नसून मल्लखांब या इथल्या मातीतील, अस्सल भारतीय अशा खेळाला मिळालेला पुरस्कार असल्याची भावना व्यक्त केली.
 

दै. मुंबई तरूण भारतशी केलेल्या अनौपचारिक वार्तालापात उदय देशपांडे म्हणाले की, पुरस्कार हे वाटेवरच्या स्टेशन्ससारखे असतात. ते येत-जात राहतात, आपण सतत पुढे वाटचाल करत राहायचे असते. त्यानुसारच मी आतापर्यंत वाटचाल केली असल्याचे ते म्हणाले. तसेच, मला मिळालेला हा पुरस्कार प्रत्यक्षात मला मिळालेला नसून मल्लखांब हा या मातीतील, अस्सल भारतीय खेळाला मिळालेला पुरस्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इतर देश जसे आपापल्या पारंपारिक खेळांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात तसेच भारत सरकारनेही मल्लखांब हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे यावा, यासाठी केल्यास तो याहून मोठा पुरस्कार ठरेल, अशीही अपेक्षा उदय देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

६५ वर्षीय उदय देशपांडे हे गेली अनेक दशके मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक म्हणून अनेक गुणी, दर्जेदार खेळाडू घडवत असून, मल्लखांबसारख्या देशी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. देशपांडे यांना राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराबद्दल क्रीडा क्षेत्रासह सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला जात आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@