स्मृती मंधानाला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |


मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार स्मृती मंधाना हिला २०१७-१८ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने तिच्या उत्कृष्ट खेळाची दाखल घेतली असून बुधवारी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

 

स्मृतीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. दि. १७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. अंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या टी-२० च्या क्रमवारीत सर्वोत्तम ३ फलंदाजांमध्ये येण्याचा बहुमान तिला मिळाला होता.

 

८८ जणांचा सन्मान

८८ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मल्लखांब या साहसी खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे उदय देशपांडे यांना जीवन गौरव, तर माऊंट एव्हरेस्ट, किलीमांजरो यांसारखी शिखरे सर करणाऱ्या प्रियंका मोहितेला साहसी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@