उदय देशपांडे यांना ‘शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव’ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |



२०१७-१८ च्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची राज्य सरकारकडून घोषणा


मुंबई : राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०१७-१८) ची घोषणा केली. यातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार हा मल्लखांब खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देणारे प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार साताऱ्याच्या प्रियंका मंगेश मोहिते (गिर्यारोहण) यांना घोषित झाला आहे.

 

राज्य सरकारच्या या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. या पुरस्कारामध्ये आर्चरी, ॲथलॅटिक्स, ट्रायथलॉन, वुशु, स्केटिंग, हॅण्डबॉल, जलतरण, कॅरम, जिम्नॅस्टीक, टेबल टेनिस, तलवारबाजी, बॅडमिंटन, बॉक्सींग, रोईंग, शुटींग, बिलियर्डस ॲण्ड स्नूकर, पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टींग, मलखांब, आट्यापाट्या, कबड्डी, खोखो, कुस्ती, बुध्दीबळ, लॉन टेनिस, हॉलीबॉल, सायकलींग, स्क्वॅश, क्रिकेट, हॉकी या विभागांतील एकूण ५५ खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे २०१७-१८ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ते या विभागात ७ पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये ९ पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला. येत्या रविवार, दि. १७ फेब्रुवारी, २०१८ रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

 

पुरस्कार निवड समितीमध्ये क्रीडामंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त यांच्यासह पद्मश्री धनराज पिल्ले, पद्मश्री प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कारार्थी रचिता मिस्त्री, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रदिप गंधे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी जय कवळी, पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी राजाराम घाग, अर्जुन पुरस्कारार्थी श्रीरंग इनामदार यांचा समावेश होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@