पंतप्रधान मोदी आणि अमित शाह घेणार १२ ज्योतिर्लिंगाच्या प्रतिनिधींची भेट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
  
 

सोमनाथ मंदिरातून भव्य शोभायात्रेला होणार  सुरुवात 

 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सोमनाथ मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान अमित शाह आणि पंतप्रधान मोदी या प्रतिनिधींची भेट घेऊ शकतात. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे सोमनाथ मंदिराचे विश्वस्त आहेत. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाने १२ ज्योतिर्लिंगांचे रथ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

१२ ज्योतिर्लिंगांचे सर्व रथ सोमनाथ मंदिरात एकत्र येणार असून तेथून शोभायात्रेला सुरुवात होईल. सोमनाथ मंदिरातून हे सर्व रथ वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरण्यासाठी रवाना केले जातील. १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान, हे सर्व रथ ३३ जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. यापैकी प्रत्येक रथ किमान तीन जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतिनिधी दुसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. २०१८ साली जानेवारी महिन्यात उज्जैन येथे हे सर्व प्रतिनिधी एकत्र आले होते. विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे नेतृत्व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी करणार आहेत. विजय रुपाणी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर हे सर्व रथ शोभा यात्रेसाठी रवाना होणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती गुजरातचे निवृत्त मुख्य सचिव पी.के लेहरी यांनी दिली. पी.के लेहरी हे सोमनाथ मंदिरातील सात विश्वस्तांपैकी एक आहेत. पंतप्रधान मोदींची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार का? याबाबत प्रश्न विचारला असता, पी.के लेहरी म्हणाले की, आम्ही पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहोत. या तीन दिवसांसाठी त्यांचा कार्यक्रम आधीच ठरलेला आहे. तरीदेखील ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील का? याचा विचार केला जात आहे. पंतप्रधान मोदी आले, तर त्यांच्यासाठी आम्ही एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करू.” या कार्यक्रमासाठी आम्ही उज्जैनमधून मदत घेणार आहोत. अशी माहितीदेखील पी.के. लेहरी यांनी दिली. विश्व हिंदू परिषदेचे सदस्य या कार्यक्रमाला हातभार लावणार आहेत. असेही पी.के लेहरी म्हणाले. वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्व करणारे रथ हे वेरावल येथील सांस्कृतिक महाविद्यालयातून २२ फेब्रुवारी रोजी रवाना होणार आहेत.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@