आम्ही कोणताच प्राणी सोडत नाही : लक्ष्मण माने; गोमांसाबद्दल वादग्रस्त विधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |


कोल्हापूर :आम्हाला बोकड खायला परवडत नाही. नरेंद्र मोदींना गायीवर इतके प्रेम का आहे?” असा प्रश्न लक्ष्मण माने यांनी विचारत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. यापूर्वीही त्यांनी मराठा समाजातील महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

 

वंचित आघाडीची सभा नुकतिच कोल्हापुरमध्ये पार पडली. त्यावेळी माने म्हणाले की, आम्ही मांजरही खातो. जो प्राणी आवडेल तो खातो. कोणताही प्राणी सोडत नाही. गोरक्षेच्या नावाखाली देशात हिंसा सुरू आहे. यात यांना कसला त्रास होतो ? जगभर गाय-बैल खतात, आम्हीही खातो. आम्हाला बोकडाचे मटन परवडत नाही. आम्ही मांजर पण खातो. आम्ही कोणताच प्राणी सोडत नाही.असे वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण माने यांनी केले आहे

 

भाजप सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांसाठी पुढाकार घेऊन या बहुजन वंचित आघाडीची निर्मिती केली आहे. आता वंचित आघाडीचा झेंडा फडकावून आंबेडकरांना मुख्यमंत्री करण्याचा आपण सर्वांनी मिळून निर्धार करूया, असे आवाहन करताना त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@