पॅराग्लायडिंग करताना पाचगणीत विदेशी पर्यटकाचा मृत्यु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
पाचगणी : महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग करताना विदेशी पर्यटकाचा मृत्यु झाला आहे. हा विदेशी पर्यटक कोरियाचा नागरिक होता. पाच दिवसांसाठी तो पाचगणीमध्ये फिरायला आला होता. मंगळवारी पाचगणीमध्ये हा विदेशी पर्यटक पॅराग्लायडिंग करत असताना ही दुर्घटना घडली. 
 
पाचगणी येथून पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर अभेपुरी गावाच्या ह्ददीत आल्यानंतर त्याचा अंदाज चुकला आणि तो डोंगरावर आदळून जखमी झाला. वाईमधील मिशन रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान, या विदेशी पर्यटकाचा मृत्यु झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच कोरियन दूतावासाचे अधिकारी वाईमध्ये पोहोचले. बुधवारी सकाळी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर त्याचा मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@