ममतांसाठी दिल्लीत बॅनरबाजी : “दिदी यहा खुलकर मुस्कुराइए आप लोकतंत्र मै है”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संविधान बचाव आंदोलनाची घोषणा केली असून ममता दिदींना निमंत्रण देण्यात आले आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही यावेळी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही यावेळी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच त्यांची खिल्ली उडवणारे पोस्टर झळकत आहेत.

 
 
 

ममता दिदी यहा खुलकर मुस्कुराइए आप लोकतंत्र में है’, अशा कोपरखळ्या विविध पोस्टर्समधून दिदींना मारण्यात आल्या आहेत. तुमची दादागिरी इकडे चालणार नाही, असे एक पोस्टर आणि त्यात ममता दिदींची दंडुकेशाही दाखवण्यात आली आहे. सुस्वागतम ममता दिदी भारताच्या लोकशाहीत तुमचे सहर्ष स्वागत, असे विविध वाद्य वाजवणाऱ्या ममता दिदींच्या व्यंगचित्रासह या पोस्टरवर दाखवण्यात आले आहे. ही पोस्टर नेमकी लावली कुणी याबाबत माहिती नाही. मात्र, या पोस्टरखाली युथ फॉर डेमोक्रसी, लोकशाहीसाठी युवा, अशी घोषणा देण्यात आली आहे.

 

 
 

#YouthForDe या हॅशटॅगद्वारे ही पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींच्या स्वागतासाठी पोस्टर लावले आहेत, अशा प्रत्येक पोस्टरखाली अशी, टीका करणारी पोस्टर लावण्यात आली आहेत. या बॅनरबाजीमुळे दिल्लीतील वातावरण संविधान बचाव आंदोलनापूर्वीच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 

 
@@AUTHORINFO_V1@@