भुपेन हजारिकांचा भारतरत्न नाकारण्याचा प्रश्न येतच नाही कारण…

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |


आसाम : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध असल्याचे सांगत गायक भूपेन हजारिका यांच्या कुटूंबियांनी भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार नाकारण्याचे ठरवल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी प्रसारित झाले. मात्र, अद्याप भुपेन हजारिका यांच्या कुटूंबियांना पुरस्कारासाठी आमंत्रण मिळालेच नसल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे.

 

भुपेन हजारिका यांच्या कुटूंबियांनी आसामच्या स्थानिक वृत्तपत्रानुसार भारतरत्न नाकारणारले असल्याचे म्हटले होते. मात्र, एका वृत्तवाहिनीशी बोलताना आम्हाला सध्या आमंत्रण मिळालेलेच नाही, असे त्यांचे पुत्र तेज हजारिका यांनी सांगितले आहे. त्यात त्यांनी भूपेन हजारिका यांच्या विचारसरणी विरोधात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, असल्याचे म्हटले आहे. यात आम्हाला अजून आमंत्रण मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 
 
 

सध्या कुटूंबियांमध्ये भारतरत्न पुरस्कार नाकारण्याचा निर्णय कुटूंबातील एक व्यक्ती घेऊ शकत नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे भुपेन यांच्या विचारसरणीपेक्षा वेगळे असले तरीही पुरस्कार नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा मुद्दा सर्व कुटूंबिय ठरवतील, असे कुटूंबियांचे म्हणणे आहे.

 

भूपेन हजारिका हे मुळचे भारतातील पूर्वोत्तर राज्य आसामचे प्रतिभावंत गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत. आसाम भाषेतील कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृतीचे जाणकार होते. स्वतःची गीते स्वतः लिहून स्वतः संगीतबद्ध करून ते गायन करत. दक्षिण आशियातील एक सांस्कृतिक गीतकार म्हणून त्यांची ओळख होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@