राजधानी दिल्लीत घुमणार शिव गर्जना : छत्रपती शिवाजी महोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्यावतीने १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महोत्सवाचेआयोजन करण्यात आले असून या महोत्सवात वैविद्यपूर्णकार्यक्रम सादर होणार आहेत.

 

येथील कॉन्स्टिट‌्युशन क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजीमहाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे महासचिव निवृत्त कर्नल मोहन काकतीकर यांनीआज ही माहिती दिली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजीसायंकाळी .३० वाजता प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचेशिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवरव्याख्यान होणार आहे.

 

प्रसिद्ध नाटक शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाचे सादरीकरण

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व आतापर्यंत सातशेहून जास्त प्रयोग झालेले शिवाजीअंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाहे नाटक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० सादर होणार आहे. विद्रोही शाहिरी जलसा व रंगमाळा यांचे सादरीकरणअसणाऱ्या या नाटकाची संकल्पना व गीत प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांचे आहे.नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे तर दिग्दर्शक नंदू माधव आहेत.

 

याच दिवशी जागतिक किर्तीचे कलाकार एस.बी.पोलाजी व कलाकारांचा समूहयांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीतरांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सायंकाळी पाच वाजल्यापासूनकॉन्स्टीट‌्युशन क्लब येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. याच दिवशी सकाळी १० वाजता येथील राजौरी गार्डन परिसरातील शिवाजी महाविद्यालयात आधुनिकभारतात शिवाजी महाराजांचे मूल्य व वारसा यांचे महत्त्वया विषयावर आंतरमहाविद्यालयीन वाद -विवाद स्पर्धा होणार आहे.

 

शिव कल्याण राजासंगीतमय कार्यक्रम

स्वरभारती प्रस्तुत शिव कल्याण राजाया संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. प्रसिद्ध गायक व संगीतकार पं.हृदयनाथ मंगेशकर व अन्य कलाकार संगीतमय प्रस्तुती देतील तरविद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

 

येथील मिंटो रोड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यालापुष्पार्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीयस्मारक समितीचे अध्यक्ष मोतीलाल व्होरा आणि उत्तर दिल्ली महानगर पालिकेचेमहापौर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्यात येणारआहे. सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महोत्सवातील सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गावरीलमावळणकर सभागृहात होणार असल्याची माहिती काकतीकर यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@