शरद पवारांचा डच्चु; 'राजा' एकटा लोकसभा लढवणार ?; अजित पवारांना हवी मनसेची साथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |


मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता राज ठाकरेंची मोठी अडचण झाली आहे. 'राज ठाकरे आत्ता काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले, तरीही येत्या निवडणुकीत ते आमच्यासोबत राहतील, असे वाटत नाही' असे वक्तव्य सांगोल्यातल्या सभेत शरद पवारांनी केले होते. मात्र, मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. राजू शेट्टींचे मतभेद दुर करू, असे अजित पवार म्हणाले आहेत. 


 
 
काका-पुतण्यांनी अशी विरोधाभासाची विधाने केल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी तातडीने सर्व नेत्यांची कृष्णकुंज या निवास्थानी बैठक घेतली.
 
 

 
 

'लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नाही. निर्णय झाल्यास आपण स्वत: जाहीर करणार', असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्यावरून राज यांनी तूर्त सावध पवित्रा घेतला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@