राफेलसंबंधी कॅग अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |



कॅगचा अहवाल मंगळवार किंवा बुधवारी संसदेत सादर होण्याची शक्यता?


नवी दिल्ली : राफेल करारासंबंधीचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा (कॅग) अहवाल आज संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे. सोमवारी कॅगने आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता. तसेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सत्र बुधवारी संपत असल्यामुळे हा अहवाल आज, मंगळवार किंवा बुधवारी संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे.

 

राफेल करारातील कथित अनियमिततेवरून काँग्रेस व विरोधकांनी रान उठविले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने या व्यवहारात भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे कॅगने सादर केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे? याची सरकार व विरोधकांना उत्सुकता लागली आहे.

 

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने राफेलवर आपले उत्तर कॅगला पाठविल्यानंतर कॅगने आपला १२ प्रकरणांचा विस्तृत अहवाल तयार केला आहे. प्रोटोकॉलनुसार हा अहवाल सर्वात आधी राष्ट्रपतींना पाठवण्यात आला असून राष्ट्रपती भवनातून हा अहवाल लोकसभेत व राज्यसभेत पाठवला जाईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@