मोदी वाढत होते जेवण, चिमुकली म्हणाली सकाळी खाऊन आलोय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षयपात्र फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी ते वृंदावनातील मुलांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांना स्वतःच्या हातांनी जेवण वाढले. त्यांच्यासह भोजनही केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी श्री प्रभुपाद एसी भक्तिवेदांता स्वामीयांच्या प्रतिमेला हार वाहून श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित मुलांशी संवाद साधत हास्यविनोदही केले. काही मुलांना स्वतःच्या हाताने जेवणही भरवले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत एक गमतीशिर किस्सा पाहायला मिळत आहे.

 
 

पंतप्रधान मोदी एका मुलीशी बोलताना म्हणाले, दीड वाजला आहे. तुम्हाला बारा वाजता जेवण मिळायला हवे होते. पंतप्रधानांना यायाला उशीर झाल्याने तुम्हालाही जेवायला उशीर झाला असेल ना?” मोदी स्वतः उशीरा येण्याबद्दल मुलीची प्रतिक्रिया ऐकू इच्छित होते. मात्र, मुलीने दिलेले उत्तर पाहून तिच्या इतर मित्र मैत्रीणी आणि मोदी स्वतःही हसू लागले.

 

मी सकाळीही खाऊन आले आहे...असे तिने सांगितले. मोदींनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आज लहानग्यांशी गप्पा मारून मला आनंद झाला. या मुलांना माझ्या उशीरा येण्यामुळे जेवण उशीरा मिळण्याचा त्रास झाला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे म्हणत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@