वरखेड येथील शेतकर्‍यांना कापूस व्यापार्‍याकडून लाखोंंचा गंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |

मापात पाप : व्यापारी व मापारी गाडी घेऊन पासर 


 
 
बोदवड, ११ फेब्रुवारी
बोदवड तालुक्यातील वरखेड येथील शेतकर्‍यांची कपाशी खरेदी करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघकीस आला. दरम्यान, तो कापूस व्यापारी येथून पळून गेला असल्याचे समजते
 
 
वरखेड येथील शेतकरी विनोद बोरले, सोपान पाटील, राजेश बोरले, विष्णू नेहते, रोहित पाटील, गणेश भोळे, भास्कर टेकडे, शंकर चौधरी, नारायण कराड, गजानन कदम, निवृत्ती चौधरी, संजय बोडके या शेतकर्‍यांचा ७० क्विंटल ६० किलो कापसाचा गफला व्यापार्‍याने केला आहे. व्यापार्‍याच्या काट्यात फॉल्ट (मापात पाप!) असल्याचे शेतकरी निवृत्ती वसंत चौधरी यांच्या लक्षात येतास व्यापारी व मापारी गाडी घेऊन पासर झाले. शेतकर्‍यांनी ३ लोकांना पकडले असता काळू शेठ सत्तार व शेख रियाज शेख हे घटना स्थळावरून पळून गेले.
 
 
याप्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. जिनिगमध्ये कपाशीचे ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपये असा भाव असतांना हा व्यापारी शेतकर्‍यांकडून ५ हजार ५०० रुपयांच्या भावात कपाशी घेत होता.
 
@@AUTHORINFO_V1@@