होमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग) भाग-८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
होमियोपॅथीक तपासणी ही रुग्णाचा सर्वांगीण व सर्व बाजूने अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे. होमियोपॅथीमध्ये आजार नाही, तर आजारी माणसाला पूर्ण बरे केले जाते. म्हणूनच आजारी माणसाची सर्व लक्षणे व सवयी यांची व्यवस्थित नोंद केली जाते. मुख्य त्रासदायक लक्षणे जाणून घेतल्यानंतर आजारी माणसाच्या लक्षणांचा अभ्यास करण्यात येतो, ज्यामुळे त्याची शारीरिक व मानसिक प्रकृती समजून घेण्यास मदत होते. या माहितीमध्ये दोन भाग असतात.
 

शारीरिक सर्वसाधारण लक्षणे

 

यामध्ये सर्वप्रथम रुग्ण कसा दिसतो, कसा पेहेराव करतो, चालण्या-बोलण्या-बसण्याच्या व विविध हावभाव करण्याच्या पद्धतींचे निरीक्षण केले जाते. यामुळे चिकित्सकाला रुग्णाविषयी अनेक गोष्टींचे ज्ञान होते. यानंतर रुग्णाच्या पचन संस्थेबद्दल माहिती घेतली जाते. त्यात रुग्णाच्या खाण्यातील आवडी-निवडी व भूक यांची माहिती घेतली जाते. उदा. भूक कमी किंवा जास्त लागणे, अतिप्रमाणात अन्नसेवन किंवा अतिप्रमाणात उपाशी राहण्याची सवय, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या अन्नाची अनिच्छा वा त्यामुळे होणारा त्रास यांची माहिती घेतली जाते.

 

यानंतर रुग्णाची पाण्याची तहान व अन्नाच्या लागणाऱ्या चवीबद्दल माहिती घेतली जाते. कधी कधी एखाद्या रुग्णाला सतत तहान लागत असते, तर काहींना पूर्ण दिवसभर जराही तहान लागत नाही. काही लोक एकावेळी भरपूर पाणी पितात, तर काही लोक एका वेळी एखादा पाण्याचा घोटच घेऊ शकतात. काहींना अतिशीत पाणी लागते, तर काही फक्त गरम पाणी पितात. याशिवाय काही लोक ठराविक वेळेतच पाणी पितात, अशा अनेक सवयी विविध रुग्णांमध्ये असू शकतात. रुग्णाच्या वैयक्तिक कारणासाठी अशा लक्षणांचा फार उपयोग होतो. याचबरोबर रुग्ण आणखी काही लक्षणे दाखवतो आहे का, याचाही विचार करण्यात येतो. उदा. भरपूर तहान लागत असताना व पाणी पिऊनही घसा सतत कोरडा राहणे, जिभ कोरडी राहावी किंवा त्याने पाणी पिताच पोटात दुखणे वा मळमळणे व उलटीची भावना होणे. तसेच एखाद्याला घनपदार्थ खाण्यापेक्षा द्रवपदार्थ जास्त आवडतात व एखाद्याला उलट म्हणजे द्रवपदार्थ अजिबात आवडत नाहीत किंवा ते खाताना त्रास होतो. याचबरोबर जीभेवर व तोंडात असलेली विशिष्ट प्रकारची चव हे सुद्धा एक लक्षण असते. जीभेवर असणारा सततचा आंबटपणा हे पित्तप्रकृतीचे लक्षण असते. पित्त किंवा आम्लपित (Acidity) यामुळे तोंडाची चव बदलते, शिवाय कुठलीही चव न लागणे किंवा अन्न बेचव वाटणे, तुरट चव असणे, तोंडात सतत कडवटपणा असणे, मेटॅलिक टेस्ट लागणे हीसुद्धा काही विशेष लक्षणे असतात. चवीबरोबरच मग रुग्णाच्या खाण्याची आवड व नावड यांचाही फार महत्त्वाचा भाग असतो. रुग्णाच्या आवडीनिवडी या थेट चैतन्यशक्तीशी संलग्न असतात. त्यामुळे ही चैतन्यशक्तीने दिलेली लक्षणे फार महत्त्वाची असतात. उदा. गोड, कडू, आंबट, तुरट, खारट इ. पदार्थ आवडणे किंवा काही विशिष्ट पदार्थ अजिबात न खाणे ही त्या रुग्णाची खास लक्षणे असतात. जेवणात मीठ असले तरी, काही लोक वरून अजून मीठ मागून घेतात व खातात इ. लक्षणे खास असतात आणि त्यांचा अभ्यासही खास असतो. पुढील भागात आपण या शारीरिक लक्षणांचा अजून अभ्यास करूया..

 

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@