तापमान नियंत्रित करेल ‘हे’ कापड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |



आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील अंग झाकण्याकामी कपड्यांचा उपयोग करण्यापासून ते आता नव्याने तयार केलेला हा कापडाचा प्रकार पाहतो तो बराच पुढे आल्याचे दिसते. सध्या जगभरात थंडीपासून बचावासाठी लोकरीचे कपडे उपयोगात आणले जातात, तर उष्णतेपासून वाचण्यासाठी सुती वा शुभ्र रंगाचे कपडे वापरले जातात. पण नव्या संशोधनानुसार एकाच कपड्यात या दोन्ही गोष्टी मिळतील. अमेरिकेच्या मेरिलॅण्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम सुतावर कार्बन नॅनोट्यूबचे कोटिंग करून हे कापड तयार केले आहे.

 

कपड्यांचा विषय आला की, रंग, प्रकार, पोत अशा गोष्टींवर चर्चा होते. पुढे नवीनच घेतलेले कपडे कधी, कुठे परिधान करायचे, हेही आपण ठरवतो. म्हणजे ऋतूनुसार पाहिले, तर उन्हाळा, हिवाळा अन पावसाळ्यातील कपडे त्या त्या काळात वापरले जातात; तर लग्न-मुंज, पार्टी, कामाच्या ठिकाणचे कपडे नेहमीच वेगळे असतात. नुकताच शास्त्रज्ञांनी कापडाचा एक नवीनच असा प्रकार शोधला जो आपल्या सर्वांनाच आवडेलही आणि उपयोगीही पडेल. शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे कापड वस्त्रप्रावरणांपासून निघणाऱ्या उष्णतेला आपोआपच नियंत्रित करेल. असे झाल्याने या कापडाच्या साहाय्याने शिवलेली वस्त्रे परिधान करणाऱ्या व्यक्तीला हवामानाच्या परिस्थितीनुसार तापमान थंड वा उष्ण राखण्यास मदत होईल. हे कापड तयार करणाऱ्या संशोधकांच्या मते, जेव्हा वातावरण उष्ण आणि दमट असेल तेव्हा या कापडातून उष्णता बाहेर पडेल आणि ज्यावेळी वातावरण थंड वा कोरडे असेल तेव्हा हे कापड उष्णता म्हणजेच उकाड्याला बाहेर पडण्यापासून रोखेल. सोबतच हे कापड घाम शोषून घेण्याचेही काम करेल. आहे की नाही कमाल?

 

आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील अंग झाकण्याकामी कपड्यांचा उपयोग करण्यापासून ते आता नव्याने तयार केलेला हा कापडाचा प्रकार पाहतो तो बराच पुढे आल्याचे दिसते. सध्या जगभरात थंडीपासून बचावासाठी लोकरीचे कपडे उपयोगात आणले जातात, तर उष्णतेपासून वाचण्यासाठी सुती वा शुभ्र रंगाचे कपडे वापरले जातात. पण नव्या संशोधनानुसार एकाच कपड्यात या दोन्ही गोष्टी मिळतील. अमेरिकेच्या मेरिलॅण्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम सुतावर कार्बन नॅनोट्यूबचे कोटिंग करून हे कापड तयार केले आहे. या धाग्याचे स्ट्रॅन्डस कार्बन नॅनोट्युब्सने कोटेड असल्याने ते वजनाने अतिशय हलके आहे. विद्यापीठातील प्राध्यापक यूहूआंग वांग या कापडाच्या संशोधनाबद्दल म्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच असे तंत्रज्ञान वापरले आहे की, ज्याच्या साहाय्याने इन्फ्रारेड किरणांना थेट प्रवेश करण्याची संधी मिळेल. या नव्या कापडाचा आधारभूत धागा अशा फायबरपासून तयार केले आहे, जो दोन वेगवेगळ्या कृत्रिम पदार्थांपासून बनला आहे. पहिला जो की, पाणी शोषून घेतो आणि दुसरा जो की, पाण्याला मागे हटवतो.

 

नव्या कापडाच्या सुतात वापरलेल्या फायबरमधील पदार्थ पाणी शोषून घेण्याबरोबरच पाण्याचा प्रतिरोधही करतो. परिणामी, जेव्हा हे कापड घामेजलेल्या शरीराच्या संपर्कात येते तेव्हा कपड्यातील फायबर खराब होते. नंतर याचमुळे यार्नचे स्ट्रॅन्डस अधिकच जवळ येतात व सुतातील रोमछिद्रे म्हणजेच पोर्स खुली होतात. असे झाल्याने उष्णता शरीराबाहेर पडण्यास सुरुवात होते आणि शरीराला थंडाव्याची जाणीव होते. दुसरीकडे बाहेरच्या थंड वातावरणामुळे शरीरही थंड व्हायला लागते तेव्हा या कापडाची यंत्रणा उलट्या पद्धतीने कामाला लागते आणि उष्णता म्हणजेच उकाड्याला बाहेर जाण्यापासून रोखते. जगाच्या इतिहासात अशाप्रकारे मानवी गरजांना अनुकूल असे कापड तयार करण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. नवनवीन प्रकारचे कापड तयार करण्याचे प्रयत्न याआधीही जगभरात झाले होते. वर्गीकरण करता पॅसिव्ह, अ‍ॅक्टिव्ह आणि अल्ट्रा या तीन प्रकारात ते केले जाते. ज्यात माणसाने शोधलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून निरनिराळ्या परिस्थितीत वापरण्यायोग्य कापड तयार करण्यात येते. हॅरी वॅनराईट, हर्बर्ट सेलबॅच, त्यानंतर स्टीव्ह मॅन यासारख्या संशोधकांनी अ‍ॅनिमेटेड, वेअरेबल कॉम्प्युटर अशी वस्त्रप्रावरणे तयार केली. पण मेरीलॅण्ड विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेले हे कापड वर उल्लेखलेल्यांपेक्षा वेगळे आहे, जे प्रथमच घडले. आता भविष्यात लवकरच या प्रकारचे कपडे दुकानादुकानात आणि मॉल्स वा ई-कॉमर्स संकेतस्थळांवरही विक्रीसाठी दिसू शकतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@