दिल्लीत करोल बाग आगीत १७ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बागेतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी मध्यरात्री (१२ फेब्रुवारी) भीषण आग लागली. आगीत एकूण १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे सुरू आहेत. 

  

या प्रकरणी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ही भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत अनेक जणांचा मृत्यू हा गुदमरून झाला. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. सकाळपर्यंत हा आकडा १७ वर पोहोचला. भाजलेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


 
 

अर्पित पॅलेस या हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी आग लागली तेव्हा अनेक जण गाढ झोपेत होते. या आगीतून २५ जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तातडीने हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या.. दिल्लीताल हे हॉटेल पाचमजली असून अनेकांनी आपला जीव वाचावा यासाठी इमारतीवरुन उडया मारल्याने काही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MtarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@