बारशाच्या कार्यक्रमात पालेकरांनी म्हटले मर्तिकाचे श्लोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |


 


अभिनेते योगेश सोमण यांचा पालेकरांवर व्यापक कटाचा आरोप

 

पुणे : प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रप्रदर्शनातील घटनेनंतर अमोल पालेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर अभिनेते योगेश सोमण यांनी टीका केली आहे. बारशाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केल्यावर पालेकर मर्तिकाचे श्लोक म्हणतात. मग औचित्यभंग होणारच असे सोमण यांनी म्हटले. यासोबतच सोमण यांनी पालेकरांवर व्यापक कट रचल्याचा आरोपदेखील केला आहे.

 

सोमण यांनी घडलेल्या प्रकाराविषयी एक चित्रफीत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून प्रकाशित केली आहे. यात त्यांनी संबंधित प्रकारचा निषेध व्यक्त केला असून पालेकरांनी व्यापक कट रचल्याचा आरोप केला आहे. यात ते म्हणाले, "अशा कार्यक्रमाला जायचं औचित्यभंग करायचा आणि पत्रकार परिषद घेऊन म्हणायचं माझी मुस्कटदाबी केली. अमोल पालेकर असा हा तुमचा व्यापक कट आहे. असं मला वाटत. बारशाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला निमंत्रित केलं आणि अमोल पालेकर तिथं मर्तिकाचे श्लोक म्हणायला लागले. ज्या बाळाचं बारसं आहे त्याच्या आईवडिलांना राग येणारच की हो. असा औचित्यभंग केल्याबद्दल मीच तुमचा निषेध करतो."

 
  आजचा अग्रलेख
 
 

काय आहे प्रकरण?

 

प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या स्मृती जागवणारे इन साईड द एमटी बॉक्स' हे चित्रप्रदर्शन नुकतेच पुणे येथे आयोजित केले होते. बरवे यांच्या मृत्यूनंतर तब्बल २४ वर्षांनी हे चित्रप्रदर्शन प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या पुढाकाराने भरवण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलाकार अमोल पालेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पालेकर यांनी बरवे यांच्याविषयी न बोलता नयनतारा सेहगल विषयाला हात घातला. मात्र, आयोजकांनी पालेकर यांना मुद्द्यावर बोलायला सांगितले. यावर पालेकर यांचा तिळपापट झाला आणि दुसऱ्यादिवशी पत्रकार परिषद घेत आयोजकांनी माझी मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला. यामुळे पालेकर यांच्यावर चोहूबाजूने टीका होत असून पालेकरांनी औचित्यभंग केल्याचा आरोप होत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@