‘चिनुक’ने वाढवली भारतीय वायुसेनेची ताकद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : ‘बोईंग सीएच-४७ चिनुक’ हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे मेडिकल आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पुरवणे असा विविध गोष्टींसाठी चिनुकचा वापर केला जातो. अत्यंत वेगवान तितकेच चपळ असलेले हे हेलिकॉप्टर जगातले सर्वात ताकदवान चॉपर असल्याचे मानले जाते. चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाई करणार्‍या देशांना गरज पडल्यास चिनुक हेलिकॉप्टरची ताकद दाखवून देता येणार आहे.


 
 

भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे, गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर ‘चिनुक’ हेलिकॉप्टरची पहिली-वहिली बॅच पोहोचली आहे. लवकरच हे ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून २२अ‍ॅपचे हेलिकॉप्टर्स व १५ ‘चिनुक’ हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला आहे. याच वर्षी सर्व १५ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील, अशी शक्यता वायुसेनेकडून वर्तवण्यात आली आहे.


 
 

चिनुकने १९६२ साली पहिल्यांदा उड्डाण भरले होते. मल्टीमिशन श्रेणीतील हे अमेरिकेच्या सैन्याची खास ताकद मानली जाते. व्हिएतनाम आणि इराक युद्धात चिनुकचे महत्वाचे योगदान आहे. इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्ट, युद्धजन्य स्थिती आणि नैसर्गिक आपत्तीवेळी चिनुकचे मोठी मदत होणार आहे. भारताकडे सीएच-४७ एफ हे चिनुक हेलिकॉप्टर आहे.


 
 

भारताने बोईंगसह २२ अपाचे आणि १५ चिनुक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये भारताची बोईंग आणि अमेरिकी सरकारबरोबर १५ ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट २०१७ ला संरक्षण मंत्रालयाने अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि १५ ‘चिनुक’मालवाहू हेलिकॉप्टर्ससह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला ४ हजार १६८ कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती.

 

अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टर्सचा वापर कित्येक देश करतात. चिनुकचा वापर करणारा भारत हा १९ वा देश ठरणार आहे. आपत्ती व्यवस्थापनावेळी चिनुक ९.६ टन इतक्या क्षमतेच्या वस्तूंची ने-आण करू शकते. काश्मिर, सियाचीन आदींसारख्या पहाडी क्षेत्रात सैन्याचा शस्त्रसाठा ने-आण करू शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@