सासऱ्याच्या पाठीत नायडूंनी खुपसले खंजीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला. चंद्राबाबू नायडूंनी स्वत:चे सासरे एनटीआर यांच्याच पाठीत खंजीर खुपसले होते, अशी जळजळीत टीका यावेळी पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या गुंटूरमधील जनसभेत केली. राज्याचा विकास सोडून मोदींना शिव्या देण्याची स्पर्धेत ते सारे काही विसरल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

"चंद्राबाबू नायडू दलबदलू असून एकामागे एक निवडणुका हरण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. केंद्रांच्या योजनांवर त्यांनी स्वत:चे स्टीकर लावून मिरवले. गरीबांच्या भल्याचे आश्वासन देत त्यांनी फक्त स्वत:च्या मुलाचेच भले केले आहे." असेही पुढे मोदी म्हणाले. आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगु देसम पक्ष एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर गेले.

 

पंतप्रधान मोदी विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळावर उतरल्यानंतर राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. राजनैतिक शिष्टाचाराला बगल देत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित नव्हता. गुंटूरमधील सभेनंतर मोदी तिरूप्पूर आणि रायचूरला भेट देणार आहेत. याव्यतिरिक्त पेट्रोलियम आणि गॅस संबंधित ६,८२५ कोटी रुपयांच्या दोन योजनांचे लोकार्पण तसेच रिमोट कंट्रोलने नल्लोर जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉरर्पोरेशन लिमिटेडच्या एका टर्मिनलचे भूमीपूजन करणार असल्याचे भाजपा खासदार जीवी एल नरसिंह राव यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@