अटीतटीच्या सामन्यामध्ये भारत पराभूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019
Total Views |



हॅमिल्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारत मालिका २-१ अशी जिंकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २१२ धावा केल्या. प्रतिउत्तरात भारत २० षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात २०८ धावा करु शकला.

 

शेवटच्या षटकात भारताला १६ धावांची गरज होती. मात्र, कृणाल पंड्या (२६) आणि दिनेश कार्तिक (३३) यांना भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विजय शंकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. विजयने झटपट ४३ धावा केल्या पण आक्रमक फटका लागवण्याच्या नादात विकेट गमावून बसला.

 

विजय पाठोपाठ पंतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने १ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने १२ चेंडूत ताबडतोब २८ धावा करुन टिकनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या सामन्यात तो ३८ धावा करु शकला. हार्दिक पंड्या २१ तर धोनीने २ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा कॉलिन मुनरो याने सर्वाधिक ७२ धावा केल्या. सीफर्टने आक्रमक २५ चेंडूत ४३ धावा केल्या. कॉलिन आणि डेरिल मिचेलने चौथ्या गड्यासाठी २२ चेंडूत ४३ धावांची भागादारी केली. त्यामुळे न्यूझीलंड २०० पेक्षा जास्त धावा करु शकला. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने ४ षटकात २६ धावा देत २ विकेट काढल्या, तर भूवी आणि अहमदला १ विकेट मिळाली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@