आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान आवश्यक : डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019
Total Views |


 

राम मंदिरासाठी पुन्हा भाजपलाच निवडून देण्याचे आवाहन

मुंबई : आधुनिक भारता साठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक आहे, अन्यथा कितीही विकास केला तरी देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो, असे स्पष्ट प्रतिपादन रविवारी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी येथे केले. भारत विकास परिषद आयोजित "आधुनिक भारताची परिकल्पना : भविष्यातील मार्ग" या विषयावर व्याख्यानात ते चेंबूर येथे बोलत होते.

 

डॉ. स्वामी यावेळी म्हणाले की या देशात संस्कृत आणि देवनागरी लिपी अनिवार्य केली पाहिजे. प्रत्येक भाषेत संस्कृत शब्दच अधिक आहेत. देशातील पाठ्यपुस्तकात देशाचा अभिमानास्पद इतिहास व संस्कृतीच्या ऐवजी मुघल आणि इंग्रजांचे उदात्तीकरण शिकवले जाते. त्यामुळे ही पुस्तकेही लवकरात लवकर बदलली पाहिजेत असेही ते म्हणाले. आज जग भारतीय संस्कृती स्वीकारते आहे, पण योगाला ख्रिश्चन योगा म्हटले जाते, हे मात्र थांबले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर्नल या नासा च्या जर्नल मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते साठी संस्कृत सर्वाधिक उपयुक्त भाषा आहे. त्यामुळे देशात संस्कृत सर्वांना शिकवली पाहिजे असे ते म्हणाले.

 

श्रीराम जन्मभूमी वर मंदिराचे काम सुरू करण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही असे ते म्हणाले. या जागी पूर्वी मंदिरच होते हे सर्वांनी मान्य केलेलेच आहे, असे सांगून स्वामी पुढे म्हणाले की या जागेचे नरसिंह राव यांनीच राष्ट्रीयीकरण केलेले आहे. आता या जागेवर कोर्टाचा काहीही अधिकार चालत नाही. केवळ मूळ जमीन मालकाला किती भरपाई द्यायची हाच निर्णय कोर्ट देऊ शकते असेही ते म्हणाले. या देशातील सर्वांचा डीएनए एकाच आहे, त्यामुळे सर्वांनी सर्व भेद विसरून एकत्र राहिले पाहिजे असे आवाहन स्वामी यांनी यावेळी केले. ते म्हणाले की प्राचीन काळात कधीही भेदाभेद असलेला आल्या संस्कृतीत व इतिहासात दिसत नाही. डॉ. स्वामी यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरे झाली. त्याचे सूत्र संचालन डॉ. रतन शारदा यांनी केले.

 

२०२० पर्यंत पाकिस्थानचे चार तुकडे झालेले दिसतील : स्वामी

 

यावेळी बोलताना डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले की २०२० पर्यंत पाकिस्थानाच्या चार तुकडे झालेले दिसतील करण सिंध, बलुच, पाखतून हे पाकिस्थानात राहू इच्छित नव्हते ते लवकरच स्वतंत्र झालेले दिसतील.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@