देशाच्या इतिहासात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक निधी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |



२०१९-२०च्या अर्थसंकल्पात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची तरतुद


नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सरकारने २०१९-२०चा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठं-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी देखील मोठी आणि ऐतिहासिक तरतुद केली आहे. तब्बल ३ लाख कोटी रुपयांची तरतुद संरक्षण क्षेत्रासाठी केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली.

 

अर्थमंत्री गोयल यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ३ लाख कोटी रुपयांची केलेली तरतुद ही भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरचे सर्वात मोठी तरतूद आहे. यावेळी गोयल म्हणाले, "आपले सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत आपले व आपल्या सीमेचे संरक्षण करतात. याचा आम्हाला त्याचा अभिमान आणि गर्व आहे. आम्ही आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात ३ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशाच्या इतिहासात आजपर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद असून गरज पडल्यास सरकार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल."

 

हा अंतरिम अर्थसंकल्प असून निवडणूक झाल्यानंतर आणखी काही गोष्टींचा यात समावेश केला जाऊ शकणार आहे. दरम्यान, सरकारने वन रँक, वन पेन्शन लागू केली आहे. यासाठी 35 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचे देखील गोयल यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@