'जलसंवाद- २०१९' ची उत्साहात सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |

जळगाव ,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठात आज दि. १ फेब्रुवारी, शुक्रवार रोजी 'जलसंवाद- २०१९' या कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशीं उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरु कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.पी. पाटील, रा.स्व. संघ देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव, डाॅ. एस. एन. पाटील, प्रा. डाॅ. एस. टी. इंगळे, पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख प्रा. डाॅ. उपेंद्र कुलकर्णी व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज कंक मंचावर उपस्थित होते. प्रा. पी.पी. पाटील यांनी कार्यक्रमाचे पाहुणे मा. भैय्याजी जोशी यांचे शाल व वृक्षरोप देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पराग पंचभाई यांनी जलसुक्त म्हंटले. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, औरंगाबादतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी एस. एन. पाटील यांनी पाण्याचे प्रश्न, समस्या व म. फुले कृषी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमामागील जलसंवाद विषयक भूमिका देवगिरी प्रांत जलपरिषद प्रमुख सर्जेराव वाघ यांनी मांडली. याप्रसंगी सेवावर्धिनी या संस्थेची पुस्तिका 'जलमंथन' व दै. तरुण भारतचा विशेषांक 'जलसंवाद'चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी जल विषयात २० वर्षापासून कायदेशीर कार्य केलेल्या अॅड. प्रदीप देशमुख व जैन इरिगेशनच्या माध्यमातून जलसेवा करणा-या अशोक जैन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, बाबूराव केंद्रे, सतिश कावळे, दत्तात्रय तावडे, जात्र्याबाबा पावरा, नरहरी शिवपुजे, लक्ष्मीताई फालक, योगेशजी राऊत, निलेश राणे इ. जलसेवकांचा सत्कार करण्यात आला.

मंचावर उपस्थित मान्यवरांपैकी उपेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात पाण्याचे दूर्भिक्ष्य व त्यावरील उपाययोजनांचे महत्व विशद केले . प्रा. पी. पी. पाटील यांनी जलसंधारणाची गरज मांडत जलसंवाद व जल परिषदेसोबत विद्यापीठ सदैव मदतीसाठी तत्पर राहील असे आश्वासन दिले. विद्यापीठातील पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेचे व्ही. एम. रोकडे यांनी आभार व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@