वायू सेनेच्या विमानाचा अपघात ; २ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |



बेंगळरू : हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड (एचएएल) एयरपोर्टवर वायू सेनेच्या मायरेज २०० विमानाचा अपघात झाला. बंगळुरूमध्ये झालेल्या या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानाच्या सांगाड्यातून दोघांना बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. बंगळुरूच्या येमलूर परिसरात सकाळी १०:३० वाजता अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की दुपारपर्यंत धुराचे लोट दिसत होते.

 

स्क्वॉड्रन लिडर समीर अबरोल, स्क्वॉड्रन लिडर सिद्धार्थ नेगी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. हे विमान अपग्रेड केल्यानंतर एचएएलने त्याच्या उड्डाणाला मंजुरी दिली होती. या दुर्घटनेमागील कारणांच्या शोधासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय हवाई दलाकडे फ्रान्सकडून आयात केलेली एकूण ५० मिराज-२००० लढाऊ विमाने आहेत. या विमानांचे आधुनिकीकरण सुरू आहे. १९८५पासून ही विमानं हवाई दलाच्या सेवेत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@