शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी सहा हजार रुपये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |


 


शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार


नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळातील अंतरिम अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत मांडला. शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीयांना समोर ठेऊन अनेक योजना व घोषणा या अर्थसंकल्पातून गोयल यांनी मांडल्या आहेत. अर्थमंत्री गोयल यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

 

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला 75 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा आणि मध्यमवर्गीयांचा असल्याचा सूर देशभरात दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@