अर्थसंकल्पाला संसदेत सुरुवात; पाहा काय म्हणतात अर्थमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार २०१९चा अर्थसंकल्प आज संसदेत आज सादर होत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. मोदी सरकारने भ्रष्टाचाराला थारा दिला नसल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला. पुढील चार महिन्यासाठीचा हा अर्थसंकल्प असणार आहे.

 
अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 
 
 
 
 

रेल्वे खात्यासाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद

 

२४ तासांत आयटी रिटर्नची प्रक्रिया पूर्ण होणार

 

देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या प्रवांशांमध्ये दुपटीने वाढ झाली

 

गर्भवती महिलांसाठी २६ आठवड्यांची पगारी सुट्टी मिळणार

 

२१ हजारापर्यंत पगार असलेल्या कामगारांना ७ हजार रुपये बोनस मिळणार

 

वन रँक वन पेन्शनसाठी डिफेन्स बजेटमध्ये ३५ हजार कोटी

 

येत्या पाच वर्षांत १ लाख डिजिटल गावांची निर्मिती करणार

 

गरीबांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद

 

ग्रॅच्युइटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये 

 
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत १५ हजार रुपये कमाई असलेल्यांना पेन्शन मिळणार
 

गरीबांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद

 

मोदी सरकारने एक कोटी ५३ लाख घरांची निर्मिती केली

 

हरियाणामध्ये २२ वे AIIMS हॉस्पिटल सुरू करणार

 

मत्स्यपालनासाठी नवा आयोग स्थापन करण्यात येणार

 

किसान क्रेडिट कार्ड आता पशुपालनासाठीही वापरता येणार

 

गोमातेचा सन्मान करण्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करणार

 

दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार

 

राज्यांना आधीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचे उत्पन्न मिळणार

 

२०२० पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार तर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार

 

कोळसा आणि स्पेक्ट्रम अशा नैसर्गिक साधनसंपत्ती वाटपात पारदर्शकता आणली

 

मोदींच्या कार्यकाळात भारत प्रगतीकडे वाटचाल करणारा देश ठरतो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@