वरळी सीफेसवर पडणार हातोडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
 
मुंबई : ८३ वर्षे जुना असलेल्या वरळी सीफेसवर लवकरच हातोडा मारला जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी बृह्न्मुंबई महानगरपालिका लवकरच वरळी सीफेसचा पट्टा ताब्यात घेणार आहे. वरळी सीफेस आणि कोस्टल रोडला जोडणारा रस्ता टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईकरांची यामुळे गैरसोय होऊ नये, याकरता प्रशासन टप्प्याटप्प्याने कोस्टल रोडचे काम पूर्ण करणार आहे. त्यामुळे वरळी सीफेसची रचना थोडीशी बदलणार आहे. परंतु वरळी सीफेस पूर्णपणे बंद केला जाणार नाही.
 

२ किलोमीटर असलेल्या या वरळी सीफेसची लांबी वाढवून ती ४ किलोमीटर केली जाणार आहे. कोस्टल रोड आणि वरळी सीफेसला जोडणारा पट्टा हा हरित पट्टा असणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी बोगद्यांची सोय असणार आहे. सध्या वरळी सीफेसच्या बाजूला होणाऱ्या कोस्टल रोडसाठी समुद्रामध्ये भराव टाकण्याचे काम सुरु आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळी येथील टोकापर्यंत ९.९८ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड असणार आहे. येत्या ४ वर्षांत कोस्टल रोड बांधून पूर्ण होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामाची विभागणी तीन भागांमध्ये करण्यात आली आहे.

 
हे काम स्वतंत्रपणे एकाच वेळी केले जाणार आहे. कोस्टल रोडचे बांधकाम हे बृह्न्मुंबई महानगरपालिकेकडून होणार आहे. या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो, एचसीसी आणि एचडीसी या कंपन्यांना मिळणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाची किंमत आधी ८ हजार कोटी रुपये होती. परंतु विविध करारांमुळे या प्रकल्पाचा खर्च १२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला भाग हा प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंत असणार आहे. या प्रकल्पाचा दुसरा भाग हा बडोदा पॅलेस ते वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळी येथील बाजूपर्यंत असेल. तसेच तिसरा भाग प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत असणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@