विद्यार्थ्यांचा भन्नाट शोध; अपघात झाला तरी वाचणार जीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |



ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

 

ठाणे : सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर अमूक-अमूक अपघातांमध्ये इतके-इतके ठार अशी बातमी आपण दररोज वाचत असतो. नादुरुस्त रस्ते, वेगमर्यादेचे पालन न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, दारू पियुन गाडी चालवणे अशी अनेक कारणे यामागे असतात. यात सर्वात जास्त यातना सोसाव्या लागतात त्या कुटुंबातील मागे राहिलेल्या सदस्यांना. मात्र, आता जरी अपघात झाला तरी प्रवाशांचा जीव वाचणार आहे. अशाप्रकारची कार एका विज्ञान संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केली आहे.
 

डोंबिवलीत आयोजित विज्ञान संमेलनात या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथील यमगरवाडीतील एकलव्य विद्यासंकुलाच्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांनी ही कार बनवली आहे. कौतुकास्पद म्हणजे, अपघात टाकणाऱ्या या री-मूव्हकारचे व कार बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी कौतुक केले आहे. दयानंद भडंगे, बालाजी क्षीरसागर, यशवंत निंबाळकर या शिक्षकांचे विद्यार्थाना मार्गदर्शन मिळाले.

 

कशी काम करते रिमूव्हकार

 

कोणताही अपघात झाल्यास किंवा चारचाकी दोन वाहने एकमेकांना धडकल्यास वाहनाचा चेंदामेंदा होत असतो. कारण, चारचाकी कारचे सगळे भाग चेसिसकडून एकमेकांना जोडलेले असतात. यामुळे गाडीच्या भागांना वेगळे होण्याची संधी मिळत नाही. मात्र, ‘रिमूव्हकारमध्ये कारचा चेसिस दोन भागात विभागला आहे. पहिला भाग स्प्रिंगने पुढच्या अ‍ॅक्सल जोडला आहे. तर दुसरा भाग मागच्या अ‍ॅक्सलला जोडला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे भाग अन्य कोणत्याही भागाला जोडले गेले नाहीत. याच्या वरील भागावर प्रवाशांच्या खुर्च्या असतात. यामुळे कार किंवा गाडीचा अपघात झाल्यास चेसिसच्या स्प्रिंगवर ताण येऊन, गाडीचा पुढून अपघात झाल्यास चेसिस व प्रवाशी मागे सरकतील व मागून अपघात झाल्यास प्रवाशी व चेसिस पुढील भागाकडे सरकेल. यामुळे गाडीचे नुकसान झाले तरी प्रवाशांचा जीव वाचणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@