भारत आता एकदिवसीय सामान्यांसाठी सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |



सिडनी : कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासीक मालिका विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष हे एकदिवसीय मालिका विजयाकडे असेल. पहिला सामना १२ जानेवारीला सिडनी येथे होणार असून भारतीय संघ सिडनीत दाखल झाला आहे. एकदिवसीय सामन्यासाठी महेंद्र सिंह धोनी बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. तर, रोहित शर्मादेखील संघामध्ये पुन्हा शामिल झाला आहे.

 

कसा असेल भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघ?

 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.

 

हे आहे सामन्याचे वेळापत्रक

 

१२ जानेवरी पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे होईल.

१५ जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना हा अॅडिलेड येथे खेळवला जाईल.

१८ जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्न येथे होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@