'ठाकरे' चित्रपटाच्या मराठी डबिंगवर घेणार निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |

 

 
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्या चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, मराठीमध्ये देण्यात आलेल्या आवाजावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. सचिन खेडेकरांनी या मराठी आवृत्तीचे डबिंग केले आहे. परंतु त्यांचा आवाज बाळासाहेबांच्या आवाजाशी मिळताजुळता नसल्याची टीका सर्वत्र केली गेली. त्यावर बोलताना चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
 

"सुरुवातीला मराठी चित्रपटालादेखील नवाजुद्दीनचाच आवाज देण्याचा आमचा प्रयत्न होता. यासाठी नवाजुद्दीनला मराठी बोलायलादेखील शिकवण्यात आले. मात्र, तरीही त्याच्या आवाजात तो सफाईदारपणा नव्हता. जो बाळासाहेबांच्या बोलण्यात नेहमीच असायचा. त्यामुळे, शेवटी याठिकाणी खेडेकर यांचा आवाज घेतला गेला." असे संजय राऊत यांनी एका माध्यामाशी बोलताना सांगितले. 'ठाकरे'च्या हिंदी आवृत्तीसाठी नवाजुद्दीनचाच आवाज ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मराठीतील आवाजाबाबत येत्या ३ ते ४ दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडेच प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@