बेस्ट संप : खासगी वाहनांना ‘प्रवासी’ मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली.

 

बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल जानेवारीपासून संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात आल्या असून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

या अधिसूचनेनुसार आता बेस्ट संप कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संप ज्यावेळी मागे घेतला जाईल, त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@