राज्यातील आणखी १० महाविद्यालये स्वायत्तता यादीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |



मुंबई : विद्यापीठ आयोगाने राज्यातील १० महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल केली आहे. यात मुंबईतील ३ नवी मुंबईतील १ आणि इतर राज्यातील अनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे. यासोबत येत्या महिन्याभरात आणखी ५ महाविद्यालयांना ही स्वायत्तता मिळणार असून त्यासाठीचा निर्णय युजीसीकडे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानच्या (रुसा) प्रधान सचिव मिता राजीव लोचन यांनी दिली.

 

राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांना स्वायत्ता देण्यासाठी मागील काही महिन्यांपासून रुसाकडून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी ५८ महाविद्यालयांना स्वायत्तता मिळाली होती. आता त्यात १० ची भर पडली असून ही संख्या ६८ वर गेली आहे. यामुळे राज्यात आता देशातील १० टक्के स्वायत्तता मिळालेले महाविद्यालये झाली आहेत. राज्यात यापैकी १२ महाविद्यालयांना रुसाकडुन प्रत्येकी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर उर्वरित महाविद्यालये या निधीसाठी अजूनही पात्र ठरलेले नाहीत.

 

रूसाच्या माध्यमातून महाविद्यालयांना देण्यात आलेली ही स्वायत्तता केवळ शैक्षणिक आहे. यातून कोणत्याही संस्थाचे अनुदान बंद होणार नाही, ही भीती आता संस्थाच्या मनातून गेली असल्याने अनेक संस्था स्वायत्तता घेण्यासाठी पुढे येत आहेत. आत्तापर्यंत राज्यात ३६५ महाविद्यालयानी स्वायत्तता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात अनुदानित असलेली आणि त्यासोबतच अल्पसंख्याक महाविद्यालय ही मोठ्या प्रमाणात स्वायत्तता घेण्याची शक्यता आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@