कोतवालांच्या मानधनात अडीच हजार रुपयांची वाढ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |



अटल निवृत्ती वेतन योजनांचाही मिळणार लाभ

मुंबई : राज्यातील कोतवालांसाठी खुशखबर असून कोतवालांच्या मानधनात अडीच हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोतवालांचे मानधन आता पाच हजारावरून ७ हजार ५०० रुपये करण्यात आहे. यामुळे तब्बल साडेबारा हजार कोतवालांना याचा फायदा होणार आहे. कोतवाल हा ग्रामीण भागातील महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक आहे. मागील अनेक दिवसांपासूनच्या कोतवालांच्या मागण्या मंत्रिमंडळाने मान्य केल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

कोतवालांच्या वेतनासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना पाटील म्हणाले, कोतवालांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना, अटल निवृत्ती वेतन योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनांसाठीच्या हप्त्यांची रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी संवर्गातील शिपाई पदांची २५ टक्के पदे कोतवालांसाठी राखीव होती. ती मर्यादा वाढवून आता शिपाई पदाची ४० टक्के पदे ही कोतवालांमधून भरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@