५९ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
मुंबई : दिनांक ८ जानेवारी २०१९ ला मुंबईची कलापंढरी म्हणून ओळख असलेल्या जहांगीर कलादालनात "महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन",(कलाकार विभाग)सुरु झाले. सायंकाळी ५.०० वाजता या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याला राज्यमंत्री श्री.रविंद्र वायकर,आमदार श्री. राज पुरोहीत आणि श्री. सौरभ विजय, प्रधान सचिव,ऊच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य,मुंबई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावर्षी शासनातर्फे ज्येष्ठ चित्रकार प्रा.प्रभाकर कोलते यांना त्यांच्या कलाविषयक योगदानाबद्दल सन्मानित केले गेले. तसेच मंत्री महोदय, प्रमुख अतिथी आणि सत्कारमुर्ती यांच्या शुभहस्ते पंधरा कलाकारांना राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 

१९५६ पासून राज्याच्या ऊच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कलासंचालनालया मार्फत राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या ऊद्देशाने या प्रदर्शनात सुमारे ३०० च्या आसपास कलाकृती प्रदर्षित केल्या जातात. त्यातूनच परिक्षकांनी निवडलेल्या सर्व विभाग मिळून एकूण पंधरा कलाकृतींना रोख रु.१०,०००/- या प्रमाणे रु.१लाख ५०,०००/- ची पारितोषिके प्रदान केली जातात. यावर्षी या पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत.....

 

१-श्री.देवताळे हर्षवर्धन प्रकाश

 

२-श्री.सौंदत्ते महेश विरुपाक्ष

 

३-श्री.टकले अमोल अरुण

 

४-श्री.देवकर युवाराज गोविंद

 

५-श्री.मिश्रा सौरभ हरीओम्

 

६-श्री.मर्गज शिवाराम वासुदेव

 

७-श्री.भंडारी प्रसाद देवेंद्र

 

८-कु.वाळीजकर वैष्णवी निलेश

 

९-श्री.कांबळे सागर वसंत

 

१०-श्री.कुंभार प्रदीप चंद्रकांत

 

११-कु.पुसाळकर मुक्ता दत्तात्रय

 

१२-कु.अपंडकर श्वेता गोपीनाथ

 

१३-श्री.अडकिने योगेश मनोहर

 

१४-श्री.मोरे वैभव मारुती
 
 

खास "दिव्यांग कलाकारांस" देखील शासनातर्फे विशेष सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार श्री.गुंजाळ विकास कमलाकर यांच्या कलाकृतीसाठी त्यांना प्रदान करण्यात आले. हे प्रदर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या तसेच भारतीय कला आणि सांस्कृतिकतेचा एक प्रसन्न अविष्कार असतो. कलाकारांच्या कलाकृती प्रचंड आशयगर्भ तर असतातच तसेच त्यांचे सादरीकरण देखील अद्भुत अशा तांत्रिक शैलींद्वारे व्यक्त झालेले असते. एकाचवेळी सुमारे तीनशेंहून अधिक कलाकारांच्या कलाकृती जहांगीर कलादालनाच्या सर्व दालनांमध्ये बघण्याची संधी मिळणे म्हणजे कला विद्यार्थी, व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला रसिक आणि कला संग्राहकांसह कलाकृती खरेदी करणारे....अशा सर्वच स्तरांवरील लोकांसाठी ही एक पर्वणीच ठरत असते. "हे प्रदर्शन सर्वांनी आवश्य भेट देवून पहावे" असे आवाहन राज्याचे प्रभारी कलासंचालक आणि सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा तसेच कलासंचालनालयांतर्गत असलेले त्यांचे सर्व सहकारी यांनी आवाहन केले आहे.

 

तब्बल अडीच तपांच्या प्रतिक्षेनंतर कलापुरस्कारांमध्ये वाढ!

 

यावेळी मंत्रीमहोदयांनी राज्य पुरस्कारांच्या रकमांमध्ये यावर्षा पासूनच वाढ करीत असल्याची घोषणा केली. ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकाराच्या पुरस्काराच्या रकमेत रु.२५,०००/-वरुन रु १,००,०००/- एवढी वाढ जाहीर करण्यात आली. तसेच कलाकारांच्या पारितोषिकांच्या रकमाही रु.१०,०००/-वरुन रु.२५,०००/-प्रत्येकी असे एकूण पंधरा राज्यपुरस्कार दिले जातील असे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्यासह पंधरा कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@