SMART प्रकल्पला मंत्रिमंडळाची मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (SMART) अंमलबजावणी करण्यास या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. हा २२०० कोटींचा प्रकल्प असून यासाठी नवीन ३७ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. SMART अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

 

१. राज्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ.

 

२. नागपूर परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ या उन्नत मेट्रो मार्गास मान्यता.

 

३. राज्यातील विविध नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये ११ मार्च १९९३ ते २७ मार्च २००० या कालावधीतील नियुक्त व कार्यरत १४१६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार. त्यासोबत अधिसंख्य अस्थायी पदे निर्माण करण्यास मान्यता.

 

४. बीड जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालयातील संगणकशास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयांस अनुदान मंजूर.

 

५. नागपूर विकास योजनेतील बोरगाव खसरा येथील क्रीडांगणाचे नामाभिधान वगळून संबंधित जागा रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यास मान्यता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@