‘रायगड ई-बुक’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |



पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन


रायगड : जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या रायगड : पर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी हा यामागील उद्देश असणार आहे.

 

रायगड ई-बुकमध्ये रायगड जिल्ह्यातील लेणी, गड-किल्ले, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, समुद्र किनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे ई- पुस्तक www.raigadtourism.com व मराठी ई- पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ www.raigad.nic.in येथेही या ई-बुकची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

मोबाईल ॲपमध्ये पर्यटनस्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदींबाबत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@