मंत्रालयातील संरक्षक जाळीवर आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |

मुंबई : मंत्रालयात बसवण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उतरून एकाने आंदोलन केल्याचा प्रकार सोमवारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात घडला. सदर व्यक्तीचे नाव लक्ष्मण चव्हाण, असे असून तो प्रजासत्ताक पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी आपल्या मागण्यांसाठी लक्ष्मण चव्हणंनवाच्या व्यक्तीने मंत्रालयात उभारण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उतरून नाट्यमय पद्धतीने आंदोलन केले.

 

यावेळी त्याच्या हातात दोन बॅनर देखील होते. दरम्यान संरक्षक जाळीवर उतरून त्याने घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांची कागदपत्रेही भिरकावली. यामुळे मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मंत्रालयातील पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी धाव त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्वरित अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. अर्ध्या तासाच्या नात्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना त्याला ताब्यात घेण्यात यश आले. दरम्यान, सदर व्यक्तीने उदी घेतली नसून ती मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उतरल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दै. मुंबई तरुण भारताशी बोलताना दिली. यापूर्वीही मंत्रालयात आणि मंत्रालय परिसरात आत्महत्येसारखे प्रकार घडले होते. त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती.

 

काय होत्या मागण्या

 

पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री हवी, शेतकरी आत्महत्या, राज्यावर कर्ज असताना मंत्र्यांच्या मानधन आणि निवृत्ती वेतनासाठी ५०० कोटी का, पूर्व प्राथमिक शालेय शिक्षण धोरण ठवण्यात उशीर का, पोलिसांची कामाची वेळ केवळ ८ तास असावी, लोकसभा विधानसभेत महिलांना ५० टक्के आरक्षण, प्रत्येक कुटुंबाला ४५० चौ. फुटांचे घर, मंत्रालयाचे नाव बदलून ते सेवालय करावे अशा अनेक मागण्या त्याने यावेळी केल्या.

 

मंत्रालयात बॅनर घेऊन प्रवेश कसा

 

मंत्रालयात प्रवेश करत असताना मंत्रालयाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेश द्वारावर पोलिसांकडून कडाक तपासणी करण्यात येत असते. अशा परिस्थितीत सादर व्यक्ती बॅनर घेऊन मत्रालयात कशी शिरली, किंवा त्याला मंत्रालयात शिरण्यासाठी कोणी मदत केली का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@