‘खेलो इंडिया’चा ९ जानेवारीपासून शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |



महाराष्ट्राच्या जवळपास ९५४ खेळाडूंचा समावेश

मुंबई : येत्या ९ जानेवारीपासून पुणे येथे खेलो इंडिया स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत एकूण १८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. बॉम्बे जीमखाना येथे पत्रकार परिषद आयोजित करून शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या स्पर्धेविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, "महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेचे यजमानपद मिळणे हा महाराष्ट्रासाठी गौरव असून यामुळे महाराष्ट्रात एक मोठा क्रीडा महोत्सव आयोजित होत आहे."

 

खेलो इंडिया स्पर्धा ९ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत होणार असून यात देशभरातून जवळपास ९ हजार खेळाडू, संघ व्यवस्थापक/मार्गदर्शक पंच/तांत्रिक अधिकारी/स्वयंसेवक असे मिळून जवळपास ४ हजार आणि एकूण १३ हजार लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे जवळपास ९५४ खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी तसेच चांगले गुण मिळवावे यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.

 

या स्पर्धेत एकूण १८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस जिम्नॅस्टिक्स, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल असे खेळ यामध्ये असतील. यावेळी क्रीडा उपसचिव राजेंद्र पवार, नेमबाज तेजस्विनी सावंत, ॲथलिट रचिता मिस्त्री उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@