आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |



मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सावंत यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटल्याने आपण आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सावंत हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदावर कार्यरत होते.

 

डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा का दिला?

 

सावंत यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या वर्षी ४ जुनला सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. तरीही मुख्यमंत्र्यांनी सावंत यांना मंत्रीपदावर कायम ठेवले होते. मात्र, नियमानुसार दोन्ही सभागृहांच्या सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य निवडून आल्याशिवाय पदावर कायमस्वरूपी राहता येत नाही. त्यानुसार सावंत यांचा ७ जानेवारी रोजी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

 

शिवसेना सावंतावर नाराज!

 

शिवसैनिकांमध्ये आणि युवासेनेमध्ये सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची चर्चा आहे. यामुळेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून सावंत यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. पदवीधर मतदारसंघाच्या गत निवडणुकीत शिवसेनेने सावंत यांच्या जागी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली होती. यानंतर पोतनीस यांनी मोठा विजय मिळवला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@