खेळाडूंसाठी आता स्वतंत्र्य एसएससी बोर्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर घडवता यावे यासाठी राज्यातील कलाकार, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एसएससीची परीक्षा देण्यासाठी शाळेत हजर राहणे बंधनकारक होते. त्यानंतरच ते बोर्डाची परीक्षा देऊ शकत होते. मात्र, आता ज्या विद्यार्थ्यांना कला किंवा क्रीडा क्षेत्रात रियर करायचे असल्यास त्यांना अगदी सहज ही संधी मिळणार आहे.

 

विद्यार्थ्यांना आपल्या सरावाला वेळ द्यावा लागत असल्याने शाळेत हजर राहणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपन बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यामुळे ज्यांना करीयरसाठी वेगळे क्षेत्र निवडायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा सुखद निर्णय ठरला आहे.

 

विनोद तावडे म्हणाले, “या ओपन बोर्डला सामान्य एसएससी बोर्डप्रमाणेच दर्जा असेल. या बोर्डाची परीक्षा डिसेंबर आणि जूनमध्ये घेण्यात असून आवडीच्या क्षेत्रात करीयर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच दिव्यांगांना नियमितपणे शाळेत हजर राहणे अनेकदा अवघड असते. त्यांनाही या बोर्डअंतर्गत दहावीची परीक्षा देता येणार आहे. यामध्ये पाचवीपासून प्रवेश दिला जाणार असून दहावीपर्यंत विद्यार्थी याअंतर्गत बाहेरुन परीक्षा देऊ शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली. या बोर्डाचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@