'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची पहिली झलक पाहिली का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : सध्या चित्रपटांमध्ये चरित्रपटांचे वारे वाहत आहे. आतापर्यंत विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींवर चरित्रपट प्रदर्शित झाले आहेत. नुकताच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटालाही ट्रेलर समोर आला. यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

 
 
 

'पीएम नरेंद्र मोदी' असे चित्रपटाचे शीर्षक असून त्याचा पहिली झलक समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाचे पोस्टर तब्बल २३ भाषांमध्ये लाँच केले आहे. अभिनेता विवेक ओबोरॉयने पंतप्रधानाची भूमिका साकारली आहे. 'मेरी कॉम'चा दिग्दर्शक ओमंग कुमार याने चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची सुरेश ओबोरॉय आणि संदीप सिंग यांनी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@