पाणीपुरी व्यावसायिकांवर एफडीएची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |


 
 
 
 
पुणे : अन्न आणि औषधे प्रशासनाने (एफडीएने) पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी येथे पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर छापा टाकला. या व्यवसायिकांवर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याचे आदेश त्यांना एफडीएने दिले. या व्यावसायिकांकडे परवाना नसल्याचे आढळून आले. पायाने पाणीपुरीच्या पुऱ्यांचे पीठ तुडवित असल्याचा एक व्हिडिओ शहरात व्हायरल झाला होता.
 

या व्हिडिओमुळे पाणीपुरी खाणाऱ्या खवय्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु हा व्हिडिओ पुण्यातील नसल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. संबंधित व्हिडिओ दापोडी येथील नसून दुसऱ्या शहरातील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या तयार केले जात असलेले ठिकाण हे अत्यंत अस्वच्छ आढळले होते. या पार्श्व भूमीवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे, अपर्णा भोईटे आणि अन्न सुरक्षा पथकाच्या अधिकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली.

 

दापोडी परिसरातील स्मशानभूमीयेथील शिवनंदन जगधारी आणि किशोर पाल या दोन व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली. अत्यंत अस्वच्छ अशा ठिकाणी हे व्यावसायिक पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करत होते. एका ठिकाणी तीन आणि दुसऱ्या ठिकाणी चार कामगार आढळले. नियामांनुसार कागदपत्रांची पूर्तता करून परवाना घेईपर्यंत या व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्यास एफडीएकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@