तुळजाभवानी मंदिरातही महिलांनी घेतले दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
तुळजापूर : वर्षानुवर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडून काढत एका महिलेने तुळजाभवीनी देवीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श केला. तुळजाभवानी ही अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. आतापर्यंत तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. परंतु तुळजापूरमधीलच काही महिलांनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडीत काढण्यात आली आहे.
 

मंजुषा मगर असे या महिलेचे नाव आहे. तिने तुळजाभवानी देवीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श केला. या महिल्यांसोबत गाभाऱ्यात अन्य काही पुजारी महिलाही त्यावेळी उपस्थित होत्या. आजवर तुळजाभवानी देवी मूर्तीला हात लावून दर्शन घेण्याची लिखित परवानगी नव्हती. याप्रकरणी तुळजापूर शहरातील काही महिलांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मंदिर संस्थांच्या कोणत्या रेकॉर्ड किंवा नियमामध्ये हे नमूद करण्यात आले आहे का? अशी विचारणा या महिलांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. याबाबत कोणतेही नियम नाहीत हे लक्षात आल्यानंतर शनिवारी रात्री या महिलांनी तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतले. तसेच तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@