भारताच्या विजयावर पावसाचे सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |


 


सिडनी : रविवारी चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर फोल्लो ऑन देत वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० वर सर्व बाद केला. त्यामध्ये कुलदिपने फिरकीची जादू दाखवत ५ मोहरे टिपले. गेल्या ३१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच मायभूमीमध्ये फोल्लो ऑनचा सामना करावा लागला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबिण्यात आला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावास सुरुवात केली असून बिनबाद ६ धावा केल्या आहेत. पाऊस भारताच्या विजयात अडसर बनला आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ३०० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारावर ३२२ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर, विराटने ऑस्ट्रेलियास फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला फिरकीच्या जाळ्यात ओढत ९९ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर, रवींद्र जडेजाने ७३ धावा देत २ गडी बाद करत कुलदीपला मोलाची साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी कडवा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पीटर हॅन्ड्सकॉम्ब आणि पॅट कमिंस यांनी अनुक्रमे ३७ आणि २५ धाव केल्या. शेवटच्या विकेटसाठी स्टार्क आणि हेजलवुडने ४२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांचा टप्पा गाठला.

 

कुलदीपची फिरकी जादू

 

भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने ५ विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ३१.५ षटकात ६ षटके निर्धाव टाकत ५ विकेट घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांवर आटोपला. कुलदीपने जादुई फिरकी गोलंदाजी करत नवा विक्रम नावावर केला आहे. २४ वर्षाच्या या फिरकी गोलंदाजाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आशियाच्या बाहेर ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. सिडनीच्या मैदानावर ५ गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडचे चायनामॅन गोलंदाज जॉनी वार्डले यांनी १९५५ याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ७९ धावात ५ गडी बाद केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@