एकाच मंडपाखाली ५०१ मुलींचे बारसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
बीड : बीडमध्ये एकाच मंडपाखाली ५०१ मुलींचा बारशाचा कार्यक्रम पार पडला. बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकडून आणि खटोड प्रतिष्ठानाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तब्बल ५०१ मुलींचे नामकरण करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे या बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. खासदार प्रितम मुंडे यांनी काही बाळांना कडेवर घेऊन त्यांचे कौतुक केले.
 

गेल्या १५ वर्षांपासून स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानाकडून बीड शहरामध्ये राज्य स्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी खटोड प्रतिष्ठानाकडून नवजात बालिकांचा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी या बालिकांच्या आईंना फेटे बांधण्यात आले होते. बालिकांच्या हातात खेळणी देण्यात आली होती. पाळण्याला छान सजावट करण्यात आली होती. बीड जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण खूप कमी आहे. गेल्या काही काळात बीडमध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. असे असलेतरी तो मुलांतच्या जन्मदराच्या तुलनेने कमी आहे. बीडमध्ये मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ व्हावी. यासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयाने आणि खटोड प्रतिष्ठानाकडून मिळून हे कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले. यासाठी बीडमध्ये जनजागृती मोहिमदेखील राबवली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@