मुंबईत १२ आणि १३ जानेवारीला जागतिक भागिदारी परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |



उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन


मुंबई : केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंन्डस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने २५वी जागतिक भागिदारी परिषद मुंबईत येत्या १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी 'जे डब्ल्यू मेरियेट' या हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ४० देशातील उद्योजक एकत्र येतील. २५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला आहे. उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रविवारी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

"या जागतिक परिषदेचे आयोजक होण्याचा मान राज्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे. यापुर्वी झालेल्या 'मेक इन इंडिया' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यातील उद्योगांना चालना मिळाली. आगामी परिषदेसाठी देखील राज्य सज्ज असून ही परिषद सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईल." असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. कॉन्फीडरेशन ऑफ इंन्डस्ट्रीजचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी यांनी या परिषदेची रूपरेषा आणि पार्श्वभूमी सांगितली. तसेच परिषद यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.

 

सुरेश प्रभू म्हणाले, "महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी अत्यंत अनुकूल वातावारण आहे. देशाने येत्या काही वर्षात १०० बिलियन डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यांचा विकास करून पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. देशाची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल करीत आहे. यासाठी उत्पादन, सेवा, कृषी, पर्यटन आणि निर्यात यासारख्या क्षेत्राच्या वाढीसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यासर्व प्रयत्नांची चर्चा आणि प्रदर्शन हे या जागतिक भागिदारी परिषदेत होणार आहे."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@