विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



मुंबई : अनेक बँकांचे सुमारे ९ हजार कोटी बुडवून देशाबाहेर पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या अखेर 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा (इडी) मार्ग मोकळा झाला आहे. नव्या कायद्याअंतर्गत फरार घोषित करण्यात आलेला मल्ल्या हा पहिलाच उद्योगपती ठरला आहे.

 

नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत विजय मल्ल्याला 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित करण्याची विनंती ईडीने अर्जाद्वारे विशेष पीएमएलए न्यायालयाला केली होती. यावरून विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी अखेर शनिवारी विजय मल्ल्याला 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित केले. देशाबाहेर पसार झालेला आरोपी विजय मल्ल्या हा नव्या कायद्याअंतर्गत 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित झालेला देशातील पहिलाच आरोपी आहे.

 

काय आहे 'फरार आर्थिक गुन्हेगार' कायदा?

 

आर्थिक घोटाळे करून देशाबाहेर पलायन करणाऱ्या आरोपींना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने हा नवा कायदा केला आहे. त्याअंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया टाळणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित करण्यात आल्यानंतर त्यांची संपत्ती तत्काळ जप्त करण्याची तरतूद आहे. आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या, कारवाई होईल या भीतीने भारतात येण्यास नकार देणाऱ्या आरोपींना हा कायदा लागू होत असून १०० कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा करणारे या कायद्याच्या कक्षेत येतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@