'पिफ'मध्ये 'या' मराठी चित्रपटांची वर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



पुणे : 'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि 'महाराष्ट्र शासन' यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या १७व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) यंदा ७ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागासाठी या ७ चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपटांच्या नावांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

 

'मुळशी पॅटर्न', 'नाळ', 'खटला-बिटला', 'भोंगा', 'चुंबक', 'बोधी' आणि 'दिठी' या मराठी चित्रपटांची यामध्ये निवड झाली आहे. १० ते १७ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'इन सर्च ऑफ टूथ-सेलिब्रेटिंग १५० इअर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी' ही या वर्षीच्या महोत्सवाचा विषय आहे. दिग्दर्शक गोन्जालो जस्टिनिअॅनो यांचा डॅम किड्स' या चित्रपटाने महोत्सवाचे ओपनिंग होणार आहे. यंदाच्या विषयाचा एक भाग म्हणून श्याम बेगेनल दिग्दर्शित 'द मेकिंग ऑफ महात्मा' आणि रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित 'गांधी' चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

 

देश-विदेश विभागात हंगेरीचे ४, अर्जेंटिनाचे ६ तर टर्कीचे ३ चित्रपट दाखविण्यात येतील. भारतासह ७ देशांतील एकूण ८ तज्ज्ञ परीक्षक चित्रपटांचे परीक्षण करणार आहेत. या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यामध्ये 'पिफ फोरम'चे आयोजन केले आहे. ज्यात २०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश यावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@